शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांनी फिरविली बाजार समितीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देअल्प दराचा परिणाम : विक्रीसाठी विविध कार्यकारी सोसायट्यांकडे कल

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे. शासनाने यावर्षी काही सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १ हजार ८३५ अधिक ५०० बोनस असे असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे. दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकºयांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्याकडेच वळविला आहे. परिणामी धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायट्यांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान कुठे ठेवावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती पदाधिकाºयांनी दिली.धान खरेदी करणाऱ्या सोसायट्याआदिवासी विकास महामंडळाने ज्या सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले. त्यामध्ये नवखळा, चिंधी चक, गोविंदपूर, कोजबी (माल), गिरगाव, सावरगाव, जीवनापूर, बाळापूर येथील आदिवासी सोसायट्यांचा समावेश आहे. याशिवाय पणन महासंघाने नागभीड येथील खरेदी विक्री संघ व कोर्धा येथील श्री गुरूदेव राईस मीलच्या सोसायटीलाही धान खरेदी करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले.तहसीलदारांनी घेतली सात-बाराची हमीसोसायटीमध्ये धानाची विक्री करायची असेल तर सदर शेतकºयाचा चालू स्थितीतला सात-बारा असणे आवश्यक आहे. सातबाºयासाठी शेतकरी तलाठी कार्यालय जात आहे. मात्र, तलाठी संपावर आहेत. त्यामुळे शेतकºयांची कोंडी सुरू झाली. अनेक शेतकऱ्याना धान विकता येत नाही. संप कधी सुटणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान सातबाऱ्याअभावी धान विक्रीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी धान खरेदी करण्याचे व संप मिटताच तलाठ्यांकडून सात-बारा उपलब्ध करून देण्याची हमी तहसीलदारांनी दिली, अशी माहिती माहिती चिमूर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक जी. आ. राठोड यांनी दिली.धान उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी आता धान विक्री करत आहेत. परंतु, बाजार समितीत धानाची आवक कमी झाली.- सप्तेश गुप्ता, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड.बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमला शेतकरी परत नेत आहेत. शासनाने सोसायटीचे दर बाजार समितीतही लागू केले पाहिजे अन्यथा बाजार समित्या बंद पडण्याचा धोका आहे.- संजय माकोडे, व्यापारी, नागभीड.

टॅग्स :Marketबाजार