शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

व्हाॅट्स अॅप चॅटिंगमुळे 'त्या' बाळाच्या अपहरणाचे बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 12:48 IST

अपहरणामागे टोळीचा संशय : अहमदाबाद येथून अपहरण करून बाळाला नेत होते विजयवाडा

चंद्रपूर : अहमदाबादवरून विजयवाड़ा येथे नवजात बालकाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी रविवारी बल्लारपूर रेल्वे स्थानकावर अटक केली. मात्र, सुरुवातीला आराेपींनी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संशय वाढल्याने पोलिसांनी त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून तपासणी केली असता व्हाॅट्स ॲप चॅटिंगमध्ये त्या बाळाच्या अपहरणाचा तपशील आढळला आणि त्या नकली जन्मदात्यांचे बिंग फुटले. रेल्वे पोलिस व बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे बाळ सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बल्लारपूर आरपीएफ व जीआरपी यांना बाळ अपहरणाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नवजीवन एक्सप्रेसच्या (गाडी क्र. १२६५५) डब्बा क्र. एस-३ मध्ये आरपीएफचे कर्मचारी व रेल्वे चाईल्ड लाईन कर्मचायांनी तपासणी केली. दरम्यान, बर्थ क्रमांक २३ वर एक जोडपे संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांच्याकडे दोन ते तीन महिन्यांचे बालक आढळले. बालकाबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. ते बाळ स्वतःचे असल्याचे सांगितले. परंतु संशय वाढला. त्यामुळे जोडप्याला बल्लारपूर रेल्वे स्टेशनला उतरवून पोलिस ठाण्यात आणले.

दोन महिन्यांच्या तान्हुल्याचे अपहरण; बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बंटी-बबलीला अटक

विचारपूस केली असता पुरुषाने स्वत:चे नाव चंद्रकांत मोहन पटेल ( ४० वर्षे, पत्ता- इंदिरानगर, संगम सोसायटी, राणी सती मार्ग, मलाड ईस्ट, मुंबई) तर महिलेने आपले नाव द्रौपदी राजा मेश्राम (४० वर्षे, पत्ता-आयबीएम रोड, धम्म नगर, गिट्टीखदान, काटोल रोड, नागपूर) असे सांगितले. त्यांच्यासोबत असलेले बाळ त्यांचे नसल्याची कबुली दिली. बालकाबाबत पुन्हा विचारले असता खरी उत्तरे न दिल्याने त्यांच्याजवळचा मोबाईल हिसकावून तपासण्यात आला. त्यातील रेकॉर्ड व व्हाॅट्स ॲप चॅटिंगमुळे बाळाला अहमदाबादवरून तस्करी करून विजयवाडा येथे नेण्यात येत उघडकीस आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, आरपीएफ उपनिरीक्षक प्रवीण महाजन, आरती यादव, प्रवीण गाढवे, पोलीस उपनिरीक्षक ए. एस. अली, डी. गौतम, अखिलेश चौधरी, बालकल्याण समिती, महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखकर, पोलिस निरीक्षक के.एन.रॉय आदींनी केली.

तो पाच हजार रूपये देणारा कोण ?

पोलिसांनी आरोपी महिलेची अधिक विचारपूस केली असता संशयित व्यक्तीने बाळाला सोबत घेऊन जाण्याचे पाच हजार रुपये दिले होते, असे तिने सांगितले. सोबत असलेल्या संशयित व्यक्तीला विचारले असता अहमदाबाद स्टेशनवर दोन व्यक्तीने बाळाला विजयवाडा येथे पोहोचून देण्याची जबाबदारी दिली होती, अशी कबुली दिली. त्यामुळे प्रकरणाबाबत दोन्ही व्यक्तींनी बरीच माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

सतर्कतेमुळे बाळ सुरक्षित

रेल्वे चाईल्डलाईन यांच्या सहकार्याने बालकाची शासकीय रुग्णालय, बल्लारपूर येथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रेल्वे चाइल्ड लाईन समन्वयक भास्कर ठाकूर, समुपदेशिका त्रिवेणी हाडके, सुरेंद्र धोंडरे, अचल कांबळे व जीआरपी कर्मचारी यांनी त्या बाळाला किलबिल दत्तक योजना व पूर्व प्राथमिक बालगृह चंद्रपूर येथे रात्री दाखल केले. बाळ सुरक्षित आहे. सोमवारी बाळाला बालकल्याण समिती समोर उपस्थित करून तात्पुरता दाखल आदेश देण्यात आला. ही माहिती बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस विभागाला दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरKidnappingअपहरणnew born babyनवजात अर्भक