रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून उद्या बाबूजींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2015 01:19 IST2015-07-01T01:19:33+5:302015-07-01T01:19:33+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकम वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती २ जुलैला चंद्रपुरात रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून पार पडत आहे.

Babuji honored yesterday by the social program of blood donation | रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून उद्या बाबूजींना आदरांजली

रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून उद्या बाबूजींना आदरांजली

लोकमत-आयएमएचा उपक्रम : डॉक्टर्स डे अंतर्गत सामूहिक आयोजन
चंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकम वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती २ जुलैला चंद्रपुरात रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून पार पडत आहे.
लोकमत जिल्हा कार्यालय आणि इंंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या संयुक्त उपक्रमातून तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या सहकार्याने हे आयोजन होत असून यात शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थाही सहभागी होत आहेत. यात रोटरी क्लब चंद्रपूर, महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह असोसिएशन चंद्रपूर (एमआर असोसिएशन), पुरूषोत्तमदास बागला होमियोपॅथी कॉलेज, सरदार पटेल महाविद्यालय, जगतगुरू व्यायाम शाळा, इको-प्रो संघटना आदी संस्था प्रामुख्याने सहभागी होत आहेत.
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाजवळील आयएमए सभागृहात सकाळी ८ वाजता या शिबिराला प्रारंभ होत आहे.
सकाळी ८ वाजता स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पाजंली अर्पण करून शिबिराला सुरूवात होईल. या शिबिरासाठी वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतिनिमीत्त देशभरात १ जुलै हा डॉक्टर डे म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा डॉक्टर्स विक म्हणून पाळला जातो. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयएमएच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमएचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था या महारक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरसावल्या आहेत. या शिबिरामध्ये रक्तदान करून नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते, सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद मुरंबिकर, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे आणि चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
रक्तदात्यांना मिळणार ओळखपत्र
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. या सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरवित केले जाणार आहे. जाणार असून शासकीय सुविधा असलेल्या १०४ टोल फ्रि क्रमांकावरील ‘ब्लड आॅन कॉल’ या योजनेअंतर्गत रक्तदात्याचे कार्ड दाखविल्यास मोफत रक्त दिले जाणार आहे.
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहन
बाबूजींच्या जयंतीनिमीत्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच आणि लोकमत युवा नेक्स्टच्या सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Babuji honored yesterday by the social program of blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.