बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार

By Admin | Updated: March 13, 2017 00:36 IST2017-03-13T00:36:09+5:302017-03-13T00:36:09+5:30

बाबुपेठ येथील रेल्वे क्रासिंगवर उड्डाणपुलाची मागणी गेल्या कित्येक वषार्पासून होती. परंतु हा पूल होत नव्हता. आम्ही पूल तयार करण्याचा निर्णय घेतला ..

Babubet railway flyover work will be completed soon | बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार

बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार

सुधीर मुनगंटीवार : रेल्वे उड्डाणपूल व स्टेडियमचे भूमिपूजन
चंद्रपूर : बाबुपेठ येथील रेल्वे क्रासिंगवर उड्डाणपुलाची मागणी गेल्या कित्येक वषार्पासून होती. परंतु हा पूल होत नव्हता. आम्ही पूल तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याकरिता तातडीने मंजुरी मिळाली. या पुलाचे काम वेगाने करून दीड वर्षात काम पूर्ण करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते बाबुपेठ येथील रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन शनिवारी रात्री झाले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.नाना शामकुळे, आ. अ‍ॅड.संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, बांधकामचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता अरूण गाडेगोणे आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंगमुळे बाबुपेठपासून चंद्रपूर शहरात येताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या क्रासिंगवर उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी आहे. यापूर्वी वारंवार मागणी करूनही हा पूल होऊ शकला नाही. आम्ही अल्पावधीतच त्याला मंजुरी दिली. येत्या दीड वर्षात हा पूल तयार असल्याचे यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले. बाबुपेठ येथील स्टेडिअममुळे होतकरू युवकांना खेळाच्या चांगल्या संधी निर्माण होतील, असे स्टेडीयमच्या भूमिपूजनानिमित्त ते म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनीही हा पूल शहराच्या विकासात हातभार लावणार असल्याचे सांगितले. शहरात विकासाची अनेक कामे होत असून त्याचा चंद्रपूरकरांना निश्चितच लाभ होत आहे. शासन विकासाचे अनेक कार्यक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबविल्या जात असून त्याची योग्य अंमलबजावणी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
या रेल्वे पुलावर ६१ कोटी ५७ लक्ष रुपए खर्च करण्यात येणार आहे. राज्य शासन व रेल्वे विभाग संयुक्तपणे सदर पुलाचे काम करणारआहे. प्रारंभी मंत्रीद्वयांसह अन्य मान्यवरांनी पुल भूमिपुजनाच्या नामफलकाचे अनावरून केले. यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Babubet railway flyover work will be completed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.