घुग्घुस येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव
By Admin | Updated: April 14, 2016 01:15 IST2016-04-14T01:15:40+5:302016-04-14T01:15:40+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती घुग्घुस सर्कलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर ....

घुग्घुस येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव
घुग्घुस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती घुग्घुस सर्कलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्ताने गुरूवारपासून तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन वेकोलि स्टेडियम व बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे परिसर (फटाका मैदान) येथे करण्यात आले आहे.
१४ एप्रिलला सकाळी १० वाजता नकोडा येथील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश व तैलचित्रासह मोटारसायकल रॅली आम्रपाली बुद्ध विहार, समता वाचनालय, गांधी चौक, तहसील कार्यालय, बस स्थानक मार्गे महाप्रज्ञा बुद्ध विहारपर्यंत निघणार आहे. जयंती उत्सवाचे उद्घाटन वेकोलि वणी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक राजीव दास यांचे हस्ते ६ वाजता होणार आहे.
१५ ला सकाळी ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता प्रा.जावेद पाशा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयावर व्याख्यान, रात्री ७ वाजता ‘महापुरुषांनो ही पहा तुमची लेकरे’ नाट्य, १६ ला सकाळी ११ वाजता वक्तृत्व स्पर्धा-गायन स्पर्धा, १ वाजता विविध वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे. (वार्ताहर)