२०५ विद्यार्थ्यांना मिळणार बाबा आमटे पुरस्कार

By Admin | Updated: February 28, 2015 01:16 IST2015-02-28T01:16:38+5:302015-02-28T01:16:38+5:30

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या स्व. बाबा आमटे गुणवत्ता पुरस्कारासाठी २०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

Baba Amte Award will be given to 205 students | २०५ विद्यार्थ्यांना मिळणार बाबा आमटे पुरस्कार

२०५ विद्यार्थ्यांना मिळणार बाबा आमटे पुरस्कार

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या स्व. बाबा आमटे गुणवत्ता पुरस्कारासाठी २०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. योजना एकमध्ये गुणवत्ताप्राप्त ७२ तर, योजना दोनमध्ये १३३ दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. मात्र या शाळांत शिकणारे विद्यार्थ्यी कुठेही मागे नाही. इयत्ता दहावी आणि बारावी पास झालेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा सोबतच दारिद्रय रेषाखालील असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाकरिता सहाय्याता मिळण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १० वी व १२ वी पास गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांची तर दारिद्रय रेषेखालील असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी चार लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये पुरस्कार स्वरुपात देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे वितरण राजुरा येथे शनिवारी करण्यात येणार आहे.
नवरत्न स्पर्धेत २२० विद्यार्थी घेणार सहभाग
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्व. यशवंतराव चव्हाण नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नवरत्न पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी २२० विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये प्राथमिक गटात कथाकथन, स्वयंस्फूर्त भाषा, वादविवाद, एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धा २८ फेब्रुवारीला इन्फंट जिजस हायस्कूल राजुरा येथे होणार आहे. उच्चप्राथमिक व प्राथमिक गटात कथाकथन, स्वयंस्फूर्त, कथाकथन, स्वयंस्फूत भाषण, वादविवाद, एकपात्री, बुद्धीमापन, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, स्वयस्फूर्त भाषण, स्वयंस्फूर्त लेखन, स्मरणशक्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा महात्मा जोतिबा फुले विद्यालय राजुरा येथे होणार आहे.

Web Title: Baba Amte Award will be given to 205 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.