इनरव्हिल क्लबतर्फे जनजागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST2020-12-29T04:27:29+5:302020-12-29T04:27:29+5:30

चंद्रपूर : इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने येथील किदवाई महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकीन मशिन बसविण्यात आली. यावेळी मुलींना विविध ...

Awareness program by Innerville Club | इनरव्हिल क्लबतर्फे जनजागृती कार्यक्रम

इनरव्हिल क्लबतर्फे जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूर : इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने येथील किदवाई महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकीन मशिन बसविण्यात आली. यावेळी मुलींना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शर्मिली पोद्दार, क्लबच्या डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग, क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. शर्मिली पोद्दार यांनी मुलींना स्वत:च्या आरोग्याबाबत घ्यावयाची, काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांना समजतील अशा भाषेत उत्तरे दिली. क्लबच्या डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग यांनी सॅनिटरी नॅपकीन वापरण्याची पद्धत याबाबत माहिती दिली. यावेळी मशिन रिफील करण्यासाठी साहित्याचा पुरवठा केला. यावेळी क्लबच्या सदस्य पुनम कपूर, शाहीन शाफीक आदी उपस्थित होते. संचालन नगमा आझाद आभार सुबिथा खान यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अलहाज शफीक अहमद यांनी इनरव्हिल क्लबचे आभार मानले.

Web Title: Awareness program by Innerville Club