प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:05 IST2018-01-20T00:04:53+5:302018-01-20T00:05:15+5:30
उपक्रमशिल आणि प्रगत शेतकऱ्यांना कृषी मेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : उपक्रमशिल आणि प्रगत शेतकऱ्यांना कृषी मेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये मधुकर भलमे, वैभवी खाडीलकर, मूल तालुक्यातील प्रशांत मेश्राम, गिरीधर वाघाडे, प्रभाकर सोनुले, विनोद राऊत, विठ्ठल हटवार, रमेश चौधरी, भद्रावती तालुक्यातील माधव जीवतोडे, दत्तुजी येरगुडे अन्य शेतकऱ्यांचा समावेश होता. चिमूर तालुक्यातील कापूस उत्पादनासाठी प्रशांत हिंगे, बंडू बुच्चे, सेंद्रीय शेतीसाठी फाल्गून गिरडकर, तूर उत्पादनासाठी ओमप्रकाश पाथोडे, श्री पध्दत भात लागवडीसाठी राजेश्वर मगरे, लक्ष्मण कूसनकार, श्रीराम देशमुख, पोंभूर्णा तालुक्यातील भाजीपाला लागवडीसाठी विजय बोडेकार, सुनील दिवसे, सुनील सातपुते, राजुरा तालुक्यातील ग्रामीण कृषी पर्यटनासाठी सुहास आसेकर, सुलोचना बोथले, गोंडपिपरी तालुक्यातील कापूस उत्पादनासाठी सुरेश रोहणकर, राजू काळे, सुरेंद्र चोथले, अशोक मोरे आणि फुलशेतीसाठी प्रभाकर गडकर, लक्ष्मण येरगुडे आदींनाही पुरस्कार देण्यात आला आहे.
उत्कृष्ट शेतकरी गट पारितोषिकामध्ये वरोरा तालुक्यातील संताजी शेतकरी समूह शेतकरी गट, मेहर स्वंयस्वायत्ता बचग गट, भद्रावती तालुक्यातील एकता सेंद्रीय शेतीसमूह गट, चिमूर तालुक्यातील भारतमाता महिला बचत गट, ब्रम्हपुरी तालुक्यातील ओम महिला स्वयंस्वायता बचत गटांचा सत्कार करण्यात आला. पुरस्काप्राप्त शेतकºयांनी स्वत:च्या शेतीमध्ये विविध प्रयोग केले. पारंपरिक शेती न करता आधुनिकेची कास धरली. त्यामुळे त्यांना मोेठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य झाले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या शेतकºयांनी पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील शेतकºयांना पारंपरिक शेतीतून बाहेर काढण्यासाठी हे आदर्श शेतकरी प्रेरणादायी ठरणार आहेत.