२०१७ च्या उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:44 IST2018-09-19T22:44:39+5:302018-09-19T22:44:55+5:30

२०१७ मध्ये जनजागृतीचे उत्कृष्ट करणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले.

Award for Best Ganesh Mandals of 2017 | २०१७ च्या उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार

२०१७ च्या उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २०१७ मध्ये जनजागृतीचे उत्कृष्ट करणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले. विजेत्यांमध्ये चंद्रपूर उपविभागामधून अथर्व गणेश मंडळाला प्रथम, उर्जानगरातील सार्वजनिक गणेश मंडळाला द्वितीय तर बालाजी वॉर्डातील जयहिंद गणेश मंडळाला तृतीय पारितोषिक देण्यात आला. याशिवाय पोलीस उपविभाग वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा, गडचांदूर येथील गणेश मंडळांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक हेमसराजसिंह राजपूत, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. संचालन पीएसआमुंढे यांनी केले. पीएसआय अमोल मांडवे यांनी आभार मानले.

Web Title: Award for Best Ganesh Mandals of 2017