दुचाकी रॅलीतून केला माळढोक संवर्धनाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:58+5:302021-02-14T04:25:58+5:30

दुचाकी रॅलीला विभागीय वन अधिकारी सारिका जगताप यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, पोलीस निरीक्षक दीपक खोबरागडे, ...

Awakening of Maldhok Conservation through Bike Rally | दुचाकी रॅलीतून केला माळढोक संवर्धनाचा जागर

दुचाकी रॅलीतून केला माळढोक संवर्धनाचा जागर

दुचाकी रॅलीला विभागीय वन अधिकारी सारिका जगताप यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, पोलीस निरीक्षक दीपक खोबरागडे, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, नगरसेवक छोटू शेख, रोटरी अध्यक्ष डॉ. मनोज जोगी, बाजार समिती संचालक संजय घागी, गुरुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मण गमे, प्रा. रुपलाल कावळे उपस्थित होते. रॅली वरोरा शहरातून निघाली. ती कळमगव्हाण, तुळाना, आष्टी, मार्डा, पांझुर्णी, चरुर वनोजा गावांत रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीचा समारोप गणेश मंदिर वनोजा वरोरा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, यादव घ्याद्र, सेवानिवृत्त राऊंड ऑफिसर बी. टी. लालसरे उपस्थित होते. यावेळी बाळू जीवने, विशाल मोरे, हितेश राजनहिरे, प्रवीण खिरटकर, वसंत बर्डे, विपिन फुलझेले, आदींचा सत्कार करण्यात आला. ग्राउंड ऑफिसर निबुदे यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Awakening of Maldhok Conservation through Bike Rally