चोर बीटी बियाण्यांचा वापर टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:34 IST2018-06-04T23:33:54+5:302018-06-04T23:34:06+5:30
हंगामापूर्वी चोर बिटी बियाणांची विक्री होताना आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावधानगिरी बाळगावी, तसेच चोर बिटी बियाणांचा वापर टाळावा, असे आवाहन बल्लारपूर मंडळ कृषी अधिकारी एम. एस. वरभे यांनी केले.

चोर बीटी बियाण्यांचा वापर टाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : हंगामापूर्वी चोर बिटी बियाणांची विक्री होताना आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावधानगिरी बाळगावी, तसेच चोर बिटी बियाणांचा वापर टाळावा, असे आवाहन बल्लारपूर मंडळ कृषी अधिकारी एम. एस. वरभे यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी विभागाकडून कोठारीतील सांस्कृतिक सभागृहात जागृती शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. शिबिराचे उद्घाटन कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य सोमेश्वर पद्मगिरवार, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव खाडे, उपसरपंच सायत्रा मोहुर्ले आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरात सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक भुषण धानोरकर, मंडळ कृषी अधिकारी वरभे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. संचालन कृषी सहायक प्रशांत गजभिये आभार राहुल अहिरराव यांनी मानले. यावेळी मनीषा भंडारवार, पद्मानंद गुडेकर, सुरेखा बोबाटे, मयूर दयालवार, कृषी संघटक उमाकांत लोधे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.