जिवतीत भाजपचे टाळा ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST2021-02-14T04:26:36+5:302021-02-14T04:26:36+5:30

कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी तहसील कार्यालय चौकातून मोर्चा काढण्यात आला. विद्युत कार्यालयावर ...

Avoid BJP's thumping movement alive | जिवतीत भाजपचे टाळा ठोको आंदोलन

जिवतीत भाजपचे टाळा ठोको आंदोलन

कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी तहसील कार्यालय चौकातून मोर्चा काढण्यात आला. विद्युत कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर कार्यालयाला टाळे ठाकण्यात आले. गोरगरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी भाजपाने चार वेळा आंदोलन केले. याप्रसंगी जिवतीचे ठाणेदार अंबिके तसेच महावितरणचे सहायक व कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा तसेच युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनात बंसी जाधव, गोपीनाथ चव्हाण, राजेश राठोड, दशरथ राठोड, माधव कुलसंगे, दत्ता शिंदे, अंकुश येमला, गोविंद टोकरे, बालाजी भुते, पंढरी वाघमारे, कैलाश आडे, फरीद शेख, सुभाष पवार, बालाजी माने, विलाश चव्हाण, रेखू राठोड, धनराज आडे, बंटी चव्हाण, भारत चव्हाण, संग्राम राठोड, प्रेम राठोड, प्रलाद मदने, राजेश हरी राठोड, विजय गोतावले, लक्ष्मण पवार, गणेश राठोड, जनार्दन चव्हाण व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Avoid BJP's thumping movement alive