नवखळा येथे भरते स्वयंस्फूर्तीने रात्रीची शाळा

By Admin | Updated: February 20, 2015 00:48 IST2015-02-20T00:48:11+5:302015-02-20T00:48:11+5:30

काही व्यक्तींना जन्मजातच समाजसेवेची आवड असते. त्यासाठी ते वेळेचे नियोजन करून मिळालेल्या वेळेचा या कामासाठी उपयोग करून घेत असतात.

Auto-fill school at Navkhala | नवखळा येथे भरते स्वयंस्फूर्तीने रात्रीची शाळा

नवखळा येथे भरते स्वयंस्फूर्तीने रात्रीची शाळा

लोकमत प्रेरणावाट
घनश्याम नवघडे नागभीड
काही व्यक्तींना जन्मजातच समाजसेवेची आवड असते. त्यासाठी ते वेळेचे नियोजन करून मिळालेल्या वेळेचा या कामासाठी उपयोग करून घेत असतात. नवखळा येथील श्रीकृष्ण देव्हारी याच पंथातले. येथील ग्रामीण रुग्णालयात लठ्ठ पगाराची नोकरी असूनही ते गावातील मुलांसाठी गावच्या देवळात रात्रीची शाळा भरवित आहेत. आणि त्यांचा हा उपक्रम गेल्या दोन महिन्यांपासून अविरत सुरू आहे.
श्रीकृष्ण देव्हारी तसे उच्च शिक्षीत. काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरीही केली. पण लगेच त्यांना शासकीय नोकरी मिळाल्याने त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. अनेक वर्ष जिल्ह्याच्या इतर भागात सेवा केल्यानंतर काही वर्षापूर्वी ते नागभीड येथे आले आणि गावासाठी काही तरी करावे, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. गावातील मुलांची शिकवणी घ्यायचा विचार त्यांनी पक्का केला.
विचार पक्का झाल्यानंतर त्यांनी मग काही पालकांना सूचना दिली. त्यानुसार पहिल्या दिवशी काही मुले आली. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली. शिकवणी वर्गाची सुंदर शाळाच तयार झाली. आज देव्हारी यांच्या या शाळेत पहिली ते ््दहावीपर्यंतची जवळपास १०० मुले रोज हजेरी लावत आहेत. एवढ्या मुलांना वेळ देऊ शकत नाही, हे देव्हारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मग आपली मुलगी अनघा हिला मदतीला घेतली. आज श्रीकृष्ण देव्हारी, त्यांची मुलगी अनघा आणि गावचे एक-दोन युवक नवखळा येथे ही रात्रीची शाळा चालवित आहेत. विशेष म्हणजे, ही शाळा अगदी मोफत सुरू आहे. गावच्या देवळातच ही रात्रीची शाळा भरत असून ती नियमित दोन तास चालते. या शाळेत मुलं देव्हारी यांना त्यांच्या शाळेत जे ‘धडे’ घेतले, त्यावरच्या अडचणी विचारतात आणि देव्हारी या अडचणी सोडविण्याचे मनापासून प्रयत्न करतात. आज शाळा - महाविद्यालयात चित्र याऊलट असल्याचे दिसते.

Web Title: Auto-fill school at Navkhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.