अब्दुल कलाम निसर्ग उद्यान पर्यटकांसाठी आकर्षण

By Admin | Updated: August 15, 2016 00:28 IST2016-08-15T00:28:42+5:302016-08-15T00:28:42+5:30

चंद्रपूर - बल्लारपूर राज्य महामार्गावर जुन्या कोसा प्रकल्पाच्या विस्तीर्ण जागेवर...

Attractions for tourists of Abdul Kalam Nature Park | अब्दुल कलाम निसर्ग उद्यान पर्यटकांसाठी आकर्षण

अब्दुल कलाम निसर्ग उद्यान पर्यटकांसाठी आकर्षण

आज लोकार्पण : पर्यटकांसाठी ठरणार अभ्यास केंद्र
बल्लारपूर : चंद्रपूर - बल्लारपूर राज्य महामार्गावर जुन्या कोसा प्रकल्पाच्या विस्तीर्ण जागेवर भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान आकारास आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्यानंतर पर्यटकांना सदर उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार असून वन्यजीव प्रेमींना अभ्यासाचे ठिकाण ठरणार आहे. या उद्यानाचे लोकार्पण सोमवारी दुपारी ४ वाजता राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात निसर्ग पर्यटनाचा आनंद मिळावा म्हणून डॉ. एपीजे अब्दूल कलाम निसर्ग उद्यान तयार करण्यात आले आहे. याची निर्मिती एफडीसीएम, वेकोलि व जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Attractions for tourists of Abdul Kalam Nature Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.