मुनगंटीवारांची कल्पकता पाहून उपस्थित भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:40+5:30

चंद्रपूरचे सैनिक स्कूल म्हटले की आपसुकच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी पूर्णत्वास आणलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो. मात्र शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन व त्याची पत्रिका तयार करताना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा उल्लेख इतर मान्यवरांच्या नावानंतर करण्यात आला.

 The attendants were impressed by the ingenuity of the Mungantiwar | मुनगंटीवारांची कल्पकता पाहून उपस्थित भारावले

मुनगंटीवारांची कल्पकता पाहून उपस्थित भारावले

Next
ठळक मुद्देसैनिक स्कूलमध्ये झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा प्रदर्शनातील प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ११० एकरात विस्तारलेले चंद्रपूरचे सैनिक स्कूल, तेथील प्रत्येक वास्तूची भव्यता, विविध आकर्षक दालने पाहून जिल्ह्यातील शिक्षकवृंद चांगलेच भारावले. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्याला मूर्तरुप म्हणून उदयास आलेले चंद्रपूरचे सैनिक स्कूल देशातील इतर सैनिक स्कूलपेक्षा सरस आणि सुंदर आहे, याची प्रचिती सर्वांनाच आली. मात्र याच सैनिक स्कूलमध्ये होणाऱ्या शिक्षण विभागाच्या दिमाखदार सोहळ्यात या वास्तूच्या शिल्पकाराचीच गैरहजेरी उपस्थित सर्वांनाच चटका लावून गेली.
येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने इन्स्पायर अवॉर्ड योजना २०१९-२० अंतर्गत नववे जिल्हास्तरीय प्रदर्शन २०, २१ व २२ जानेवारी या कालावधीत येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. चंद्रपूरचे सैनिक स्कूल म्हटले की आपसुकच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी पूर्णत्वास आणलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो. मात्र शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन व त्याची पत्रिका तयार करताना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा उल्लेख इतर मान्यवरांच्या नावानंतर करण्यात आला. येथील सैनिक स्कूलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नसतो. मात्र या प्रदर्शनाच्या निमित्ताने तीन दिवस सर्वांनाच या शाळेत प्रवेश देण्यात आला. जिल्हाभरातील शिक्षक या सोहळ्याला आले होते. मात्र सोहळ्यापेक्षा सर्व शिक्षक सैनिक स्कूलचे भव्यता पाहण्यातच मग्न झाले. तेथील एकेका वास्तूची आकर्षक बांधणी पाहून सर्व शिक्षक भारावले. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कल्पकता सर्वांनाच थक्क करून गेली. विशेष म्हणजे, या सोहळ्याला माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आले नाही. त्यांच्याच कल्पकतेने साकारलेल्या सैनिक स्कूलमधील सोहळ्यात त्यांची अनुपस्थिती होती, ही खंत उपस्थित अनेक शिक्षकवृंदांनी बोलून दाखविली.

भाषणातून व्यक्त झाली खंत
इन्स्पायर अवार्डच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सैनिक स्कूलचे स्वप्न पाहिले. केवळ स्वप्नच पाहिले नाही तर अवघ्या पाच वर्षात ते देशात पहिल्या क्रमांकाचे ठरावे, असे साकारूनही दाखविले. यासाठी मुनगंटीवारांनी दाखविलेली गंभीरता आणि केंद्र सरकारकडे सतत केलेला पाठपुरावा आपण स्वत: बघितला आहे, असेही या मान्यवराने भाषणात बोलून दाखविले. या भव्य वास्तूचा शिल्पकारच या सोहळ्यापासून अशा पद्धतीने दूर व्हावा, ही अतिशय गंभीर बाब असून हे आपल्याला आवडलेले नाही, असेही सदर मान्यवराने आपल्या भाषणातून स्पष्ट सांगून टाकले.

Web Title:  The attendants were impressed by the ingenuity of the Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.