अट्टल घरफोड्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:18+5:302021-07-21T04:20:18+5:30
चंद्रपूर : दुर्गापूरसह शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्यास दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून सोने, चांदीच्या ...

अट्टल घरफोड्यास अटक
चंद्रपूर : दुर्गापूरसह शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्यास दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून सोने, चांदीच्या दागिन्यासह ९४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमोल आदेश ईलमकर (२०) रा. समतानगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दुर्गापूर परिसरात घरफोडी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. येथील डीबी पथकाने तपास करून अमोल इमलकर यास ताब्यात घेतले. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता सुगतनगर, समतानगर, शक्तीनगर येथे घरफोडी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी एक सोन्याची गोप, सोन्याची अंगठी, ४ हजार ५०० रुपये रोकड, ४२५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ९४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनात डी.बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, पोहवा सुनील गौरकार, पोलीस शिपाई मनोहर जाधव, सूरज लाटकर, संतोष आडे आदींनी केली.