चंद्रपूर, दि. 21 - वासेरा येथील सिंदेवाही तालुक्यातील मौजा जामसाळा (जुना ) येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी जखमी झाला आहे. जोगू तिमाजी रंधये (वय ६५ वर्ष) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. शिवणी वनपरिक्षेत्राअंतर्गत जामसाळा येथील जोगू रंधये हे नेहमी प्रमाणे जनावरे घेऊन जंगलाच्या दिशेने जात होते. यावेळी वाघाने जोगू यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाने जोगू यांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे . गेल्या तीन दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने एका जनावराचाही खात्मा केला होता. या घटनेपासून वनविभागाने घटना स्थळावर कॅमेरे लावले होते. दरम्यान, क्षेत्र सहाय्यक एस. एन. कन्नाके, बीट वनरक्षक ए. एन. मेश्राम, वनमजुरासह वाघाचा शोध घेत आहेत.
चंद्रपुरातील जामसाळा येथे वाघाचा गुराख्यावर हल्ला, गुराखी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 14:41 IST