पत्रकारावर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: February 5, 2016 00:51 IST2016-02-05T00:51:16+5:302016-02-05T00:51:16+5:30

येथील एका प्रादेशिक दैनिकाचे पत्रकार तथा चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव मंगेश खाटीक यांच्यावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली आहे.

Attack on the journalist | पत्रकारावर प्राणघातक हल्ला

पत्रकारावर प्राणघातक हल्ला

पोलिसांना निवेदन : चौकशीचे आश्वासन
चंद्रपूर : येथील एका प्रादेशिक दैनिकाचे पत्रकार तथा चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव मंगेश खाटीक यांच्यावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांना चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने एक निवेदन देऊन अज्ञात आरोपीचा शोध घेण्याची मागणी केली असून दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
२ फेब्रवारीच्या रात्री कार्यालयीन कामकाज आटोपून रात्री १०.३० वाजता ते आपल्या दुचाकीने घरी निघाले असता बसस्थानकासमोरील उड्डाण पुलावर मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा शर्ट पकडून अश्लूश शिवीगाळ करीत वाहनावरून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी वाहन वळवून रामनगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यापूर्वीही २६ फेब्रुवारी २०१५ च्या रात्रीही अशाच प्रकारे त्यांना अडवून मारहाण करण्यात आली होती. त्यावेळीही पोलिसात तक्रार दाखल केल्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून खाटीक यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमधील आरोपी एकच असून विनाक्रमांकाच्या वाहनाचा वापर आरोपीने केल्याची तक्रार आहे.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांना शिष्ठमंडळाने दिलेल्या निवेदनातून चौकशीची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर देण्यात आल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Attack on the journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.