आमिष दाखवून दोन विद्यार्थिनीवर अत्याचार

By Admin | Updated: March 2, 2016 00:29 IST2016-03-02T00:29:57+5:302016-03-02T00:29:57+5:30

चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंढरी येथील एका विद्यार्थिनीला चिमूरच्या यात्रेतील रातघोडा दाखविण्याच्या बहाण्याने

Atrocities on two girls by showing bait | आमिष दाखवून दोन विद्यार्थिनीवर अत्याचार

आमिष दाखवून दोन विद्यार्थिनीवर अत्याचार

पास्को अंतर्गत गुन्हा दाखल : नेरी-खांबाडा मार्गावरील घटना
खडसंगी : चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंढरी येथील एका विद्यार्थिनीला चिमूरच्या यात्रेतील रातघोडा दाखविण्याच्या बहाण्याने मोटरसायकलने नेत असताना नेरी-खांबाडा मार्गावरील निर्जन जागेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० फेब्रुवारी घडली.
याबाबतची तक्रार गावातील तंटामुक्त समितीकडे पीडितेने केली. मात्र तंमुसकडून तोडगा न निघल्याने सदर प्रकरण चिमूर पोलिसांकडे सोपवण्यात आले. तंमुस व पीडितेच्या तक्रारीवरुन चिमूर पोलिसांनी आरोपी अक्षय जनबंधू, योगेश कसाटे व एका १७ वर्षीय आरोपीवर कलम ३७६ (२) आय ३५४, ३४ आयपीसीआरडब्लू ४, ८, १२ पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
चिमूर तालुक्यातील पेंढरी येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेणारी पीडिता चिमूरच्या यात्रेतील प्रसिद्ध रातघोडा पाहण्यासाठी गावातील ओळखीचा मित्र राकेश निखोडे याच्यासोबत एका मैत्रिणीसह मोटरसायकलवर चिमूरकडे निघाली. मात्र चिमूरकडे जाताना मित्राने सदर मुलीवर अत्याचार केला.
तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने काही आपल्या अन्य मित्रांना तेथे बोलावून पीडितेवर अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त केले.
दरम्यान, पीडित मुलीने गावात परत जाऊन घडलेल्या प्रकाराची आई-वडीलांना दिली. आई-वडिलांनी या प्रकाराची तक्रार तंटामुक्त समितीकडे केली. मात्र पीडिता व एक आरोपी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण चिमूर पोलिसांकडे वर्ग केले. चिमूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
मंगळवारी तीनही आरोपींना वरोरा येथील सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा तपास ठाणेदार संतोष ताले करीत आहेत.
एका गुन्ह्याच्या तपासात दुसरा गुन्हा उघडकीस
सातघोडा पाहण्याच्या दिवशी झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका पीडितेसोबत असलेल्या मैत्रिणीचे बयाण घेत असतानाच चिमूर पोलिसांना दुसरा गुन्हाही उघडकीस आणण्यात यश आले आहे.
२८ फेब्रुवारीला मैत्रिणीसोबत जाणाऱ्या दुसऱ्या पीडितेचे बयाण घेत असताना पीडितेने सांगितलेल्या आपबितीवरून चिमूर पोलिसांनी आरोपी राकेश मनोहर निखोडे याच्याविरुद्ध भादंवि ३७६, आर.डब्ल्यू.४, १२ लहान मुलांचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राकेश निखाडे हा पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करीत होता, हेदेखील चौकशीत निष्पन्न झाले आहे. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Atrocities on two girls by showing bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.