चंद्रपुरातील एटीएम ‘कॅशलेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:28+5:30
बँकातील वाढती गर्दी कमी व्हावी, यासाठी बँक व्यवस्थाने एटीएम सुविधा निर्माण केल्या. तसेच सर्व शाखेतील खातेदारांना एटीएमचे वितरण केले. त्यामुळे वेळी-अवेळी रोकड काढणे सोईचे झाले. ऐन वेळी रोकड मिळत असल्याने अनेकजण बँकेतून विड्राल न करता एटीएमच्या भरोशावर असतात.

चंद्रपुरातील एटीएम ‘कॅशलेस’
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऐन दिवाळीच्या दिवशी शहरातील संपूर्ण एटीएममध्ये रोकड नसल्याने शहरवासियांना मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागत आहे.
बँकातील वाढती गर्दी कमी व्हावी, यासाठी बँक व्यवस्थाने एटीएम सुविधा निर्माण केल्या. तसेच सर्व शाखेतील खातेदारांना एटीएमचे वितरण केले. त्यामुळे वेळी-अवेळी रोकड काढणे सोईचे झाले. ऐन वेळी रोकड मिळत असल्याने अनेकजण बँकेतून विड्राल न करता एटीएमच्या भरोशावर असतात.
चंद्रपूर शहरात एसबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सीडीसीसी बँक, एचडीएफसी बँक, एक्सीस बँक, कॅनेरा बँक, पंजाब नॅशनल बँक, सिडिकेट, इन्डोसन या बँकेसह विविध खासगी एटीएम मशिन आहेत. मात्र दिवाळीच्या दिवशी चंद्रपूर शहरातील सर्व एटीएममधील रोकड संपल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दिवाळीच्या दिवशी अनेकजण वस्तू खरेदी करतात. त्यामुळे शहरातील बाजारपेठसुद्धा सजली आहे. नवनविन वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. मात्र एटीएममध्ये रोकड नसल्याने अडचण जात आहे.
ग्रामीण भागातही हीच स्थिती
चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. सावली, मूल यासह विविध ठिकाणच्या एटीएमध्ये रोकड नसल्याने अडचण वाढली आहे.