एटीएम फोडणाऱ्या अल्पवयीन मुलास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST2021-01-18T04:26:08+5:302021-01-18T04:26:08+5:30

चंद्रपूर : दुर्गापूर वेकोली येथील एटीएम तसेच सीसीटीव्ही कॅमेरा फोडणाऱ्या अल्पवयीन मुलास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लोखंडी रॉड ...

ATM burglar arrested | एटीएम फोडणाऱ्या अल्पवयीन मुलास अटक

एटीएम फोडणाऱ्या अल्पवयीन मुलास अटक

चंद्रपूर : दुर्गापूर वेकोली येथील एटीएम तसेच सीसीटीव्ही कॅमेरा फोडणाऱ्या अल्पवयीन मुलास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केले आहे. दुर्गापूर वेकोली शक्तीनगर येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून पैसे पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करण्यात आली. मात्र, एटीएमचे सील तुटले नसल्याने चोरट्याला रक्कम पळविता आली. याबाबतची तक्रार दुर्गापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी परिसराचा पंचनामा करून आरोपीवर कलम ३७९, ५११ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास करून संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, एटीएम फोडल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एटीएम फोडताना वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, पोहवा सुनील गौरकार, नापोशि उमेश वाघमारे, पोलीस शिपाई मनोहर जाधव, संतोष आडे, सुरज लाटकर आदींनी केली.

Web Title: ATM burglar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.