सुभाष धोटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST2021-05-14T04:27:27+5:302021-05-14T04:27:27+5:30

संबंधित निधीचा धनादेश आमदार धोटे यांनी राजुराचे तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. हा धनादेश देताना नगराध्यक्ष अरुण ...

Assistance to CM Assistance Fund from Subhash Dhote | सुभाष धोटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

सुभाष धोटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

संबंधित निधीचा धनादेश आमदार धोटे यांनी राजुराचे तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. हा धनादेश देताना नगराध्यक्ष अरुण धोटे, हेमंत झाडे, अशोक राव उपस्थित होते.

आमदार सुभाष धोटे स्वतः राजुरा विधानसभा क्षेत्राच्या चारही तालुक्यांत स्थानिक उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत असून, आपल्या प्रयत्नाने ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन बेड, अ‍ॅम्ब्युलन्स, अन्य आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्थानिक आरोग्य सुविधांसाठी त्यांनी आपल्या आमदार विकास निधीतून एक कोटी रुपये मंजूर केले आहेत, तर अन्य निधीतूनही आरोग्य सेवेवर ते विशेष बाब म्हणून निधी खर्च करीत आहेत.

Web Title: Assistance to CM Assistance Fund from Subhash Dhote