राजुऱ्यात उमेदवारांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 00:48 IST2016-10-22T00:48:55+5:302016-10-22T00:48:55+5:30
येथील शुभमंगल कार्यालयात नगराध्यक्ष अािण नगरसेवकासाठी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमोर इच्छुकांची एकच झुंबड उडाली.

राजुऱ्यात उमेदवारांची झुंबड
काँग्रेसचे तिकीट : अध्यक्षपदासाठी अरुण धोटे, स्वामी येरोलवारची दावेदारी
राजुरा : येथील शुभमंगल कार्यालयात नगराध्यक्ष अािण नगरसेवकासाठी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमोर इच्छुकांची एकच झुंबड उडाली. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, शहर अध्यक्ष सुनील देशपांडे, मुस्लीम समाजातून एकमेव एजाज अहमद यांनी उमेदवारी मागितली.
नऊ प्रभागामधून १५ उमेदवारासाठी एकच गर्दी झाली.प्रभाग क्रमांक एक गढी वॉर्ड मधून आशा लांडे, माया पाकमोडे, सुनिल देशपांडे, किशोर पानकर, विजय चन्ने, प्रभाग क्रमांक दोन आंबेडकर वॉर्ड - गजानन भटारकर, किशोर रागीट, ईश्वर ठाकरे, सुनूल सोमलकर, तब्बसूम खान पठान, नादेरा बेगम पठान, शाहीत कुरेशी आदी, प्रभाग क्रमांक तीन शिवाजी वॉर्ड- संध्या चांदेकर, सविता दिवे, आनंद दासरी आदी, प्रभाग क्रमांक चार रमाई वॉर्ड- दीपा करमनकर, वैशाली दुबे, बेबीनंदा दुर्गे, प्रियदर्शिनी उमरे, रमा येमुर्ले, हरजितसिंग संधू, सतीश रामगीरवार आदी, प्रभाग क्रमांक पाच जवाहर वॉर्ड- वनमाला बतकमवार, साधना लांडे, ज्ञानेश्वर लांडे, कृष्णा खामनकर, शब्बीर खॉन पठान आदी, प्रभाग क्रमांक सहा आठवडी बाजार- भूपेश मेश्राम, संतोष मेश्राम, महादेव आत्राम, निर्मला साळवे, निलीमा सुरेश साळवे आदी, प्रभाग क्रमांक सात मौलाना आझाद वॉर्ड- प्रिती रेकलवार, रजनी सेपूरवार, बी. यू. बोर्डेवार, एजाज अहमद, साजीद बियाबानी, सुधाकर धात्रक, सय्यद सखावत अली, अशोक राव आदी, प्रभाग क्रमांक आठ सोमनाथपूर वॉर्ड- उमेश रोहणे, संदीप आदे, आनंद येवले, प्रभाकर येरणे, राजू सोमलकर, इंदूबाई निकोडे, सुमन पिपरे आदी, प्रभाग क्रमांक नऊ इंदिरा नगर - रवींद्र त्रिशुलवार, सूरज ताखल्लीवार, गीता रोहणे आदींनी उमेदवारी मागितली. निरीक्षक म्हणून एस. क्यू. झामा, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, सुभाष धोटे, तालुकाध्यक्ष दादा लांडे, अब्दुल हमीद, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राय उपस्थित होते. तिकीटासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी)
अनेकांच्या मागणीमुळे द्विधास्थिती
एकाच वार्डात अनेकांनी निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. त्या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, आता इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांची समजून घालण्याची पाळी येणार आहे.