मतदान केंद्रावरील सुविधांबाबत तहसीलदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:33+5:302021-01-08T05:34:33+5:30
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश आहेत. तसेच संपर्कात येणाऱ्यांना सुद्धा कोविड - १९च्या अनुषंगाने ...

मतदान केंद्रावरील सुविधांबाबत तहसीलदारांना साकडे
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश आहेत. तसेच संपर्कात येणाऱ्यांना सुद्धा कोविड - १९च्या अनुषंगाने योग्य दिशानिर्देश देण्यात यावेत. बहुतांश मतदान केंद्र शाळेत आहेत. तेथील भौतिक सुविधा उपलब्धतेसाठी मुख्याध्यापकांना जबाबदार न धरता ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयांना दिशानिर्देश देण्यात यावेत. निवडणुकीत अनुज्ञेय मानधन व भत्ते मिळण्यास दीर्घकाळ लागतो. ते सर्व मानधन, भत्ते तत्काळ अदा करावेत.
महिला, दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त, ५३ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात यावे. मतदान केंद्रस्थळी, तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयस्थळी निवडणुकीदरम्यान आरोग्यपथक नेमण्यात यावे, या मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गौरकार, तालुकाध्यक्ष दिनेश टिपले, कार्यवाह नामदेव सुरपाम, कोषाध्यक्ष युवराज सोनवणे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश कोयताडे व जिल्हा प्रतिनिधी संजय मोहुर्ले यांचा समावेश होता.