आशुतोष सलील चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी
By Admin | Updated: May 13, 2016 01:00 IST2016-05-13T01:00:43+5:302016-05-13T01:00:43+5:30
वर्धेचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी झाले आहेत. राज्य शासनाने आयएसए अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली.

आशुतोष सलील चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी
चंद्रपूर: वर्धेचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी झाले आहेत. राज्य शासनाने आयएसए अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार आशुतोष सलील हे चंद्रपुरचे जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत. सलील यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सलिल यांची ओळख आहे. त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सलील यांना चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून आणण्यासाठी इच्छूक होते. यासंदर्भात चंद्रपुरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांना विचारणा केली असता, त्यांनीही आपल्या जागी आशुतोष सलील येत असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)