अशोक जीवतोडे यांच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार

By Admin | Updated: June 14, 2015 02:12 IST2015-06-14T02:12:21+5:302015-06-14T02:12:21+5:30

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय व कॉन्व्हेंटमध्ये सामाजिक बांधीलकी जोपासत

Ashok Jyotodude's birthday is a social bonding corner | अशोक जीवतोडे यांच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार

अशोक जीवतोडे यांच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार

चंद्रपूर: चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय व कॉन्व्हेंटमध्ये सामाजिक बांधीलकी जोपासत संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांचा ५५ वा वाढदिवस गुरूवारी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध शाखांमध्ये ५५ वृक्षांची लागवड करण्यात आली तर आयोजित शिबिरात ५५ युवकांनी रक्तदान करुन सामाजिक संदेश दिला.
चंद्रपूर हा राज्यातील सर्वात प्रदूषित जिल्हा आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, ती काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन संस्थेच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव तालुका, नागपूर जिल्ह्याील नागपूर आणि सावनेर तालुका तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील विविध ठिकाणच्या शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालय असणाऱ्या त्या गावांच्या परिसरात ५५ वृक्षांची लागवड करण्यात आली. विविध ठिकाणच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांनी ५५ वृक्ष लावण्याची हमी दिली व सोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आणि शपथ याप्रसंगी घेतली.
चंद्रपूर हा जिल्हा अपघाताच्या बाबतीतही अग्रस्थानी आहे. अनेकदा रक्ताचा तुटवडा जाणवतो. याची जाणिव ठेवून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. जनता महाविद्यालयाच्या परिसरात ५५ युवकांनी रक्तदान करुन वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक व शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Ashok Jyotodude's birthday is a social bonding corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.