गुरुदेव सेवा कार्यातील विशेष योगदानासाठी अशोक जीवतोडे यांचा सत्कार
By Admin | Updated: November 1, 2015 01:10 IST2015-11-01T01:10:53+5:302015-11-01T01:10:53+5:30
गुरुदेव सेवा मंडळासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने गुरूकुंज मोझरी येथे ...

गुरुदेव सेवा कार्यातील विशेष योगदानासाठी अशोक जीवतोडे यांचा सत्कार
चंद्रपूर : गुरुदेव सेवा मंडळासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने गुरूकुंज मोझरी येथे ३१ आॅक्टोबरला चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांचा सत्कार करण्यात आला.
मोझरी येथील ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान शनिवारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातील कार्यकर्ता संमेलन आणि सत्कार समारंभ पार पडला. या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातून डॉ.अशोक जीवतोडे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषा हजारे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव वानखेडे होते. रामकृष्णदादा बेलूरकर, विदर्भ सचिव भानुदास कराडे, चंद्रपूरचे सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे, जगन्नाथदास बोढाले गुरुजी, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, राष्ट्रसंतानी दाखविलेल्या मार्ग समाज उन्नतीचा आहे. ही काळाची गरज असल्याने आपण या कार्यात समर्पित भावनेने आणि जोमाने कार्य करू. तन, मन, धनाने आपण सर्वांसोबत राष्ट्र, असे ते म्हणाले. या समारंभात आपला सत्कार होणे हे आपले भाग्य असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला राज्यभरातील प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)