Asha Worker, employees should be informed about the truth | आशा वर्कर, कर्मचाऱ्यांना सत्य माहिती द्यावी

आशा वर्कर, कर्मचाऱ्यांना सत्य माहिती द्यावी

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहन : जिल्हाभरात आरोग्य सर्वेक्षणाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून आवाहन करतानाच जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत पोहोचविण्यासाठी गंभीरतेने प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरोघरी येणाºया आशावर्कर व कर्मचाऱ्यांना योग्य माहिती, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी केले.
घरातील कोणी एका सुदृढ माणसाने या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी गरज असेल तरच ओळखपत्रासह बाहेर पडावे. अन्यथा कोणीही बाहेर पडून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासन करत आहे. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करताना नागरिकांनी गदीर्ही करू नये, हेही बघावे लागत आहे. जिल्ह्यांमध्ये सोमवारी एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. विदेशातून आलेल्या २८ लोकांना १४ दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत ९५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण केले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रविवार पाठवण्यात आलेल्या ९ पैकी ८ नमुने निगेटिव्ह आले. एका नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
जिल्ह्याच्या सीमा सर्व बाजूंनी बंद करण्यात आल्या आहे. प्रत्येक नागरिकांची तपासणी सुरू आहे. गावापासून तर चंद्रपूर सारख्या महानगरांमध्ये आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे जर कुणी आजारी असेल तर त्याची माहिती कळवावी. कोरोना हा आजार योग्य उपचाराने काही दिवसांच्या कालावधीत संपूर्णत: बरा होऊ शकतो. त्यामुळे वेळीच औषधोपचार व संपर्कात न येणे हेच यावरचे उपाय असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

भाडेकरूंना सक्ती करू नका
सध्या सर्वांना घरीच बसून राहण्याचे निर्देश दिले असल्यामुळे व व्यवहार बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या किरायेदाराकडून सध्याच घर मालकांनी किरायाची सक्ती करू नये. याचा अर्थ किराया माफ झाला असे नव्हे. तर केवळ या महिन्यासाठी घेऊ नये, हा किराया पुढील महिन्यात घ्यावा. यासोबतच त्याला घर खाली करायला सांगू नये, असे निर्देश केंद्र शासनाकडून आले आहेत.

संस्थांनी आर्थिक मदत करावी
मुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या माध्यमातून कोरोना संदर्भात लोकोपयोगी कामे हाती घेतली जात आहे. ही लढाई आणखी काही दिवस चालणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

खासगी रूग्णालये सुरू
कोरोना आजारामुळे नागरिक दहशतीत आहेत. अशावेळी आजारांसाठी त्यांना वैद्यकीय सल्ला आणि योग्य उपचारही आवश्यक असतात. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे संबंधित सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करण्याचे मान्य केले.

स्थानिक उद्योग तयार करणार सॅनिटायझर
जिल्ह्यामध्ये सॅनिटायझर व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी स्थानिक स्तरावरील सर्व कारखाने सुरू करण्याचे सांगितले आहे. प्रत्येक अत्यावश्यक आस्थापनावरील प्रमुख व्यक्तीने आपल्या कर्मचाºयांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. ज्या कामगारांचा संबंध जीवनावश्यक वस्तूंशी आहे. त्या सर्वांनी ओळखपत्र सोबत ठेवून कामावर पोहोचावे.

Web Title: Asha Worker, employees should be informed about the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.