ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:02+5:302021-01-13T05:12:02+5:30
चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र ...

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र पाणी बिल न भरण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. यामुळे ऐन हिवाळ्यात गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
ग्रामीण नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल असे नागरिकांना वाटत होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतने पाण्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. काही गावात पाणीपुरवठा योजनेस दोन वीज मोटारपंप असल्याची माहिती आहे. मात्र यातील दोन्ही मोटारपंप बंद असल्याने गावात पाणीपुरवठा बंद असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात हातपंप आहे, मात्र ते नादुरुस्त असल्याने तिथूनही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरीतील पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. पैसाच नसल्याने मोटारपंप दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे.
बाॅक्स
गावातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली आहे. मात्र देखभाल-दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना वीज कनेक्शन नसल्याने तर काही मोटारपंप बंद असल्याने या योजनेला अखेरची घरघर लागली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.