रेल्वे लाइनमुळे रामपुरात कृत्रिम पूर परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:24+5:302021-07-23T04:18:24+5:30
राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत ...

रेल्वे लाइनमुळे रामपुरात कृत्रिम पूर परिस्थिती
राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प
सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत असून याचा परिणाम दिवसेंदिवस मानवी जीवनावर होत आहे. राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. यामधूनच सिमेंट व कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे लाइन आहे. पावसाळ्याच्या दिवसात याच रेल्वे लाइनच्या दोन्ही बाजूने लांब अंतरावरून जंगलातील व इतर ठिकाणचे पाणी रामपूर वस्तीकडे येऊन राजुरा-गोवरी राज्यमार्गावर व वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी शिरून कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली असून प्रवाश्यांना व रामपूर येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
माणिकगड (चुनाळा) येथून अंबुजा, एल. ॲन्ड टी., माणिकगड, वेकोलि परिसरात माल वाहतुकीसाठी असलेली रेल्वे लाइन रामपूर वस्तीलगत गेली आहे. रेल्वे लाइन व रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. पाऊस आला की या परिसरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी रामपूर वस्तीकडे असलेल्या उतार भागाने येते. मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने राजुरा-माथरा राज्यमार्गालगत व या मार्गावर कृत्रिम पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसर जलमय झाला आहे. काहींच्या घरात पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. ही समस्या नेहमीचीच झाल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना होत असून याच परिसरात असलेल्या प्रियदर्शनी विद्यालय रामपूर या शाळेलासुद्धा होत आहे. यासंबंधी प्रशासनाला माहिती दिली. परंतु रेल्वे विभाग याकडे लक्ष देत नसल्याने ही कृत्रिम पूरस्थिती नेहमीचीच असल्याचे बोलले जात आहे.
220721\img_20210722_152658.jpg
राजुरा-माथरा रोडवर रामपूर येथे साचलेले पाणी