एआरटी केंद्रात एका महिन्यात १४९ रुग्णांची नोंद

By Admin | Updated: August 10, 2015 00:42 IST2015-08-10T00:42:25+5:302015-08-10T00:42:25+5:30

एचआयव्ही बाधित रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात औषधी उपचार व नियमित तपासणी करून सल्ला मिळावा याकरीता ...

ART center has 149 patients in a month | एआरटी केंद्रात एका महिन्यात १४९ रुग्णांची नोंद

एआरटी केंद्रात एका महिन्यात १४९ रुग्णांची नोंद

वरोरा येथे केंद्र : चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातील रूग्णांना मिळतेय लाभ
वरोरा : एचआयव्ही बाधित रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात औषधी उपचार व नियमित तपासणी करून सल्ला मिळावा याकरीता वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात अ‍ॅन्टी रिरोवायरल थेरीपी (एआरटी) सेंटर स्थापन करण्यात आले. स्थापनेपासून एक महिन्याच्या कालावधीत तब्बल १४९ रुग्णांची नोंद या सेंटरमध्ये झाली असून त्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार सुरू झाला आहे. वरोऱ्यातील एआरटी सेंटर हे चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरे सेंटर असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
चंद्रपूर सामान्य रुग्णालयात सर्वप्रथम एआरटी सेंटर स्थापन करण्यात आले. या सेंटरवर चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत रुग्ण औषधी उपचाराकरिता जात होते. जिल्ह्यात एकमेव एआरटी सेंटर असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली होती. सोबतच चंद्रपूरला जाणे यवतमाळ जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, माजरी, चिमूर येथील रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने तसेच गैरसोयीचे होत होती. त्यामुळे अनेक एचआयव्ही बाधित रुग्ण औषधी उपचार व सल्ल्यापासून वंचीत राहत होते. यामुळे वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात एआरटी सेंटरची स्थापना करण्यात आली. एका महिण्यात या सेंटरची माहिती परिसरात पसरताच १४९ रुग्ण जुळले आहेत. या रूग्णांवर औषधोपचार व नियमीत तपासणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
रूग्ण जोडण्याची कार्यवाही सुरू
वरोराच्या सेंटरमध्ये तपासणी, मार्गदर्शन व औषधी उपचार नियमीत केला जात आहे. याकरीता स्वतंत्र युनीट तयार करून त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. वरोरा येथील एआरटी सेंटरला वरोरा, भद्रावती, चिमूर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आदी तालुक्यातील एचआयव्ही बाधीत रुग्ण जोडण्यात येणार असून सेंटरला रुग्ण जोडण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: ART center has 149 patients in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.