४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा; रावत हल्लाप्रकरणी विजय वडेट्टीवारांचा अल्टिमेटम

By राजेश भोजेकर | Updated: May 12, 2023 09:01 IST2023-05-12T09:00:57+5:302023-05-12T09:01:08+5:30

राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याची घटना जिल्ह्यात प्रथमतः घडली असं वडेट्टीवार म्हणाले.

Arrest the attackers within 48 hours; Ultimatum of Vijay Vadettivar in Santosh Rawat attack case | ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा; रावत हल्लाप्रकरणी विजय वडेट्टीवारांचा अल्टिमेटम

४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा; रावत हल्लाप्रकरणी विजय वडेट्टीवारांचा अल्टिमेटम

चंद्रपूर - जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते संतोष सिंह रावत यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मूल शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री व काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आरोपीला ४८ तासांत अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तसेच या हल्ल्या मागे मुख्य सूत्रधार कोण..? या प्रकरणाची तातडीने चौकशी करून ४८ तासाच्या आत आरोपी व मुख्य सूत्रधार यांना बेड्या ठोकाव्या अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. 

तसेच राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याची घटना जिल्ह्यात प्रथमतः घडलेली असून पोलीस विभागामार्फत या गंभीर घटनेची कसून चौकशी करून हल्लेखोर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी केली आहे.
 

Web Title: Arrest the attackers within 48 hours; Ultimatum of Vijay Vadettivar in Santosh Rawat attack case