‘त्या’ वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:19 IST2018-06-18T23:18:42+5:302018-06-18T23:19:08+5:30

सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी व अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. या परिसरात वाघाचे नेहमीच दर्शन होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. वनविभागाने यासंदर्भात चौकशी करून वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

Arrange that tiger | ‘त्या’ वाघाचा बंदोबस्त करा

‘त्या’ वाघाचा बंदोबस्त करा

ठळक मुद्देवनमंत्री मुनगंटीवार यांचे आदेश : सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी व अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. या परिसरात वाघाचे नेहमीच दर्शन होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. वनविभागाने यासंदर्भात चौकशी करून वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये वनाच्छादित भागात अनेक वेळा वाघामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जिल्ह्यासाठी वाघ हा महत्त्वपूर्ण प्राणी आहे. मात्र यासोबतच वनाशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या जीवीत्वाची किंमत अमूल्य आहे. जिल्ह्यामध्ये मानव व वन्यजीव संघर्ष जनजागृती आणि उपायोजना संदर्भात वेळोवेळी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांचे नेहमी सहकार्य असून या जिल्ह्यातील वाघ पर्यटनाचे व मिळकतीचे माध्यम आहे. तरीही अशा परिस्थितीत नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे पहिले कर्तव्य असून वनविभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्वांनी सिंदेवाही तालुक्यामधील वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी एकत्रित मोहिम आखावी, असे निर्देशही वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
अहवाल सादर करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील जंगलाशेजारी राहणाऱ्या गावांमध्ये वनावर आधारित अनेक जोडधंद्याला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी अगरबत्ती उद्योगांपासून पर्यटनाच्या पूरक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. जंगलामध्ये नागरिकांना जावे लागू नये, यासाठी शंभर टक्के गॅस वितरणाचा यशस्वी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांना रोजगार मिळण्यासोबतच शेताला कुंपणाची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. तरीही अशा काही दुर्दैवी घटना घडतात. मात्र या भागातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे पहिले कर्तव्य असून संबंधित विभागाने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबतही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Arrange that tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.