शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

पत्नीशी वाद; स्टॅम्प पेपरवर नोट लिहून पतीने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:12 IST

दिवसेंदिवस वाद वाढत गेल्याने त्याने उचलले टोकाचे पाऊल

उपरी (चंद्रपूर) : सावली पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पोलिस दूरक्षेत्र व्याहाड ( खुर्द ) हद्दीतील मौजा उपरी येथील रहिवासी आकाश राजेंद्र येनप्रेडीवार (२७) याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून घराजवळील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, यावेळी आकाश याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असून तिला पोलिसांनी काहीही करू नये, अशी नोट लिहून ठेवली आहे.

याच वर्षी मे महिन्यात आकाश याचा अहेरी येथील खुशबू नामक युवतीबरोबर विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये पटेनासे झाले. दिवसेंदिवस वाद वाढत गेल्याने अखेर आकाशने गुरुवारी रात्री मोठा भाऊ अतुल राजेंद्र येनप्रेडीवार याला व्हॉट्सॲपवर मी आत्महत्या करीत आहे. घराजवळील झाडाला प्रेत लटकले आहे, असा संदेश दिला. एवढेच नव्हे तर मी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून ठेवले असून तो पेपर बेडमध्ये आहे, असे सांगितले. लगेच कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व सावली पोलिसांना माहिती देण्यात आली.

तिला सुखरूप माहेरी जाऊ द्या...

शुक्रवारी सकाळी मृतकाने जो शंभर रुपयांच्या पेपरवर माहिती लिहून ठेवली होती, तो पेपर पोलिसांना देण्यात आला. यात मृतकाने माझी पत्नी खुशबू हिच्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला खूप त्रास आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. मात्र, या प्रकरणात खुशबूला काहीही न करता तिच्या माहेरी अहेरी येथे सुखरूप सोडून द्यावे, असे लिहून ठेवले आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार बोरकर करीत आहेत.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर