विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्यास पुरातत्व विभागाची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:42 IST2017-07-19T00:42:27+5:302017-07-19T00:42:27+5:30

भद्रावती नगर परिषद ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहरातील ऐतिहासिक व पर्यटन असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा भद्रावती नगर परिषदेचा माणस आहे.

Archaeological department's stance for developmental works in Winson's Buddhist | विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्यास पुरातत्व विभागाची आडकाठी

विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्यास पुरातत्व विभागाची आडकाठी

अभिप्राय देण्याला विलंब : नागरिकांत रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती नगर परिषद ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहरातील ऐतिहासिक व पर्यटन असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा भद्रावती नगर परिषदेचा माणस आहे. भद्रावती नगर परिषदेने विंजासन बुद्ध लेणी येथील विकासात्मक कामे करण्याकरिता न.प. सर्वसाधारण सभेत ३० मे रोजी ठराव घेतला व कामे प्रस्तावित केली. प्रस्तावित कामास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालयाच्या निर्णयान्वये ४ जानेवारी २०१७ ला १९९ लाखांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. मात्र या कामांत पुरातत्व विभागाकडून आडकाठी येत आहे.
भद्रावती नगर परिषदेने ८ एप्रिल २०१७ ला संबंधीत काम करण्याकरिता निविदा मागविल्या. मागविण्यात आलेल्या निविदेच्या दरास न.प. सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन २ मे २०१७ रोजी मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विंजासन बुद्ध लेणी पुरातत्व विभागाकडे असल्याने व यापूर्वी न.प. ने घेतलेल्या कामास पुरातत्व विभागाकडून आलेली आडकाठी लक्षात घेता, नगराध्यक्षांनी २६ एप्रिल २०१७ ला अधीक्षक पुरातत्व विभाग नागपूर यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून अभिप्राय देवू असे कळविले होते.
अधीक्षकानी विंजासन बुद्ध लेणीची प्रत्यक्ष पाहणी केली असता. न.प. स्थापत्य सल्लागाराकडून विंजासन बुद्ध लेणी विकास कामाचे स्ट्रक्चरल डिझाईन सादर करण्याबाबत कळविले. त्यानुसार नगराध्यक्ष व स्थापत्य सल्लागार यांनी प्रत्यक्ष उपस्थित होवून विंजासन बुद्धलेणीचे स्ट्रक्चरल डिझाईन सादर केले.
नगर पालिका कार्यालयाकडून विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्याचा अहवाल सादर करण्याबाबत पुरातत्व विभागाला कळविण्यात आले. परंतु दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही पुरातत्व विभागाचा अभिप्राय अप्राप्त आहे. त्यामुळे विंजासन बुद्ध लेणी येथील मजूर कामे सुरू करण्यास विलंब होत आहे.
विंजासन बुद्धलेणीमध्ये विंजासन बुद्ध लेणी येथील जोड रस्त्याचा विकास करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, लेणी परिसरामध्ये बालोद्यान व बगीचा तयार करणे व विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांना अधीक्षक पुरातत्व विभाग नागपूर यांची मान्यता प्राप्त होणार नाही, तोपर्यंत कामाला सुरुवात करता येणार नाही. मात्र काम सुरू न झाल्यामुळे भद्रावती शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनाकडून काम त्वरित सुरू करण्याबाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे. मात्र पुरातत्व विभाग मान्यता देण्यास विलंब करीत असल्याने कामास विलंब होत आहे.

निधी परत जाण्याची शक्यता
भद्रावती शहरातील विंजासन लेणीच्या विकासाची नागरिकांना प्रतीक्षा आहे. कामाला विलंब झाल्यास नागरिकांचा रोष वाढू शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पुरातत्व विभागाची राहील. मंजूर कामे विहीत मुदतीत पूर्ण न झाल्यास निधी खर्च होणार नाही व निधी खर्च न झाल्याने यापुढे भद्रावती नगर पालिकेला प्रादेशिक पर्यटन निधी मधून निधी सुद्धा उपलब्ध होणार नाही. यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याने नगराध्यक्ष धानोरकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Archaeological department's stance for developmental works in Winson's Buddhist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.