गडचांदूर येथील गॅस वितरकांचा मनमानी कारभार
By Admin | Updated: November 4, 2014 22:37 IST2014-11-04T22:37:58+5:302014-11-04T22:37:58+5:30
लोकसंख्येने झपाट्याने वाढलेल्या गडचांदूर शहरात सिलींडरसाठी दिवसभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे. शहरात बल्लारशावरुन एचपी गॅस सिलिंंडरचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना गाडीची

गडचांदूर येथील गॅस वितरकांचा मनमानी कारभार
कोरपना : लोकसंख्येने झपाट्याने वाढलेल्या गडचांदूर शहरात सिलींडरसाठी दिवसभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे. शहरात बल्लारशावरुन एचपी गॅस सिलिंंडरचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना गाडीची वाट पाहत दिवस काढावे लागते. अशातच अधिकचे पैसे मोजूनही वितरकांकडून सुविधा मिळत नसल्याने वितरकाप्रति ग्राहकांत तिव्र असंतोष आहे.
मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकाला सिलींंडरसाठी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. इंडियन कंपनीची दुसऱ्या एजन्सीत तर ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊनही सिलिंंडर दिले जात नाही. लखमापूर, बाखर्डी, तडोधी या गावातील काही नागरिकांचे नंबर लावूनही वेळेवर सिलिंंडर मिळत नसल्याने अनेक ग्राहकांनी गडचांदुरात सिलिंंडर गॅस एजन्सी देण्याची मागणी केली आहे.
जास्तीचे पैसे देऊनही विक्रेत्यांकडून योग्य तशी सुविधा मिळत नसल्याने ग्राहक आक्रोशात आहेत. नेहमी नंबर लावला की नेहमी मोबाईल वरती येणाऱ्या मेसेजची प्रतीक्षा करावे लागते. कधी मॅसेज येतो तर कधी येत नाही. त्यामुळे ग्राहकांना तीन ते चार दिवस सारखी प्रतिक्षा करावी लागते. इंडियन आणि एचपी या दोन्ही एजन्सी सध्या कार्याबाहेर आहेत.
तळोधी येथील एका ग्राहकाला मोबाईलवर एसएमएस आला. परंतु त्याच्या खात्याचे बिलच न निघाल्याने त्याला दोन दिवस तळोधी ते गडचांदूरला ये-जा करावे लागले.
दोन्ही एजन्सीकडून जास्तीचे पैसे घेऊनसुद्धा सुविधा देत नसल्याने गडचांदूर येथे एजन्सी देण्याची मागणी असून मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी.
(तालुका प्रतिनिधी)