येनोली माल पांदण रस्त्याच्या मातीकामाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:11+5:302021-03-24T04:26:11+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल येथील अपूर्ण असलेल्या पांदण रस्त्याच्या मातीकामासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हा सरपंच सेवा ...

येनोली माल पांदण रस्त्याच्या मातीकामाला मंजुरी
सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल येथील अपूर्ण असलेल्या पांदण रस्त्याच्या मातीकामासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे नागभीड तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच अमोल बावनकर यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. मागणीची तत्काळ दखल घेत, येनोली माल येथील गावातील मुख्य रस्ता ते ऋषी बन्सोड यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता मंजूर करण्यात आला असून, याबाबतचे प्रपत्र येनोली ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहे.
सदर पांदण रस्ता २०२० ते २०२१च्या आराखड्यात समाविष्ट केला होता. हा रस्ता ३ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. निवेदन देताना सरपंच अमोल बावनकर, जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमराज लांजेवार, गंगासागर हेटीचे सरपंच दिलीप गायकवाड उपस्थित होते.