शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

१.२८ कोटींचा अखर्चीत निधी खर्च करण्यास मंजुरी

By admin | Updated: January 3, 2017 00:39 IST

राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती ....

नक्षलग्रस्त भाग : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार चंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत २०१४-१५ मधील अखर्चीत निधी २०१६-१७ मध्ये खर्च करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे. त्या संदर्भात २ जानेवारीच्या परिपत्रकान्वये नियोजन विभागाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. विशेष कृती कार्यक्रमांतर्गत अखर्चीत निधी रुपए १ कोटी २८ लक्ष ७१ हजार रुपये २०१६्१७ मध्ये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली असून यात प्रस्तावित कामे अन्य कोणत्याही योजनेतून घेण्यात आलेली नाही. नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, जिवती, राजुरा, सावली, गोंडपिपरी, मूल, कोरपना या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, स्वच्छतागृहांचे बांधकाम या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. या कामांसाठी मार्च-२०१५ मध्ये निधी प्राप्त झाला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेशसुध्दा देण्यात आले होते व कामाला सुरूवात करण्यात आली होती. आॅक्टोबर-२०१५पासून सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना पुनर्नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे देयके तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे मार्च-२०१६मध्ये हा निधी खर्च करता आला नाही. त्यामुळे प्रगतीपथावर असलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही अडचण लक्षात घेता हा अखर्चीत निधी खर्च करण्यास मंजुरी मिळण्यासाठी वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार यांच्या निदेर्शान्वये परिपत्रक निर्गमित करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये संरक्षक भिंत, स्वच्छतागृहे या सुविधा पुरविण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे. (प्रतिनिधी)