सत्र संपल्यानंतर नोटबुक खरेदीला मंजुरी

By Admin | Updated: March 19, 2015 00:49 IST2015-03-19T00:49:51+5:302015-03-19T00:49:51+5:30

जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण केले जाते. यासाठी विशेष निधीचीही तरतूद करण्यात येते.

Approval of purchase of notebook after the session expires | सत्र संपल्यानंतर नोटबुक खरेदीला मंजुरी

सत्र संपल्यानंतर नोटबुक खरेदीला मंजुरी

चंद्रपूर: जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण केले जाते. यासाठी विशेष निधीचीही तरतूद करण्यात येते. चालु वर्षामध्ये नोटबुक खरेदी न करता सत्र संपल्यानंतर नोटबुक खरेदीसाठी हालचाली सुरु झाल्या. एवढेच नाही तर, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये खरेदीला मंजुरीही देण्यात आली. यामुळे सत्र संपल्यानंतर खरेदी करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न विरोधी सदस्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या विषयासह अन्य विषयांला घेऊन सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली.
स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना आणि काही कंत्राटदारांवर असलेला जिल्हा परिषदेचा आशीर्वाद यावर चांगलेच वादंग माजले. जिल्हा परिषदेतील कामे काही मोजक्याच कंत्राटदारांना मिळते, त्यामुळे अन्य कंत्राटदारांनाही संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीवर विशेष चर्चा झाली. त्यामुळे आता नव्या कंत्राटदारांनाही कामे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिला बचत गट, ग्रामपंचायती, तंटामुक्त समित्यांना सतरंजी पुरविण्यासाठीही मंजुरी देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Approval of purchase of notebook after the session expires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.