ग्राम विकास योजनेंतर्गत एक कोटींच्या कामांना मंजुरी
By Admin | Updated: August 9, 2014 01:37 IST2014-08-09T01:37:49+5:302014-08-09T01:37:49+5:30
राज्यातील गावाअंतर्गत मुलभुत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे ...

ग्राम विकास योजनेंतर्गत एक कोटींच्या कामांना मंजुरी
राजुरा : राज्यातील गावाअंतर्गत मुलभुत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील गावाअंतर्गत रस्ते व अन्य सुविधांसाठी ग्रामविकास विभागाने एक कोटीच्या निधीला राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार आहे.
ग्राम विकास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मुलभुत सुविधांच्या कामासाठी ग्रामविकास विभागाने जिवती तालुक्यातील मौजा जिवती येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, मौजा टाटाकवडा ग्रा.पं. खडकी हिरापूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, मौजा कुंभेझरी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, गोंडपिपरी तालुक्यातील वडोली अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, मौजा आक्सापूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, सोनापूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, देवाडा येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, कोरपना तालुक्यातील लोणी येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, कोळशी येथील बु. अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, अशा एकुण १० कामांना एक कोटी निधीची प्रशासकीय मान्यता ग्रामविकास विभागाने दिली आहे.
यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी विशेष प्रयत्न केल्याने कामांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत गोदरू पा. जुमनाके, निशीकांत सोनकांबळे, उपसभापती सुग्रीव गोतावळे, प्रल्हाद मदने, विष्णु गुरमे, रंगनाथ देशमुख, अशपाक शेख, शेख ताजुद्दीन, कोरपना पं.स. सभापती हिराताई रणदिवे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, सरोज मुनोज, नानाजी आदे, अविनाश जाधव, माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे, सुधाताई सिडाम, माजी पं.स. सभापती साईनाथ कुळमेथे, पं.स. सदस्य हर्षाली गोडे, वृंदावणी मून, अब्दुल जमीर, गोंडपिपरी पं.स. सभापती हर्षा चांदेकर, पं.स. सदस्य रामचंद्र कुरवटकर, रत्नमाला तोरे, वडोलीचे सरपंच मिना ईटेकर, उपसरपंच विलास चौधरी, माजी सरपंच कांता पा. सुद्री, कार्याध्यक्ष राजु कवटे, आक्सापूर सरपंच ऋषी धोडरे, महेंद्र कुनगाळकर, प्रा. चाफले, लोणीचे सरपंच गजानन काकडे, उपसरपंच रामशाव तोडासे, सेवा सहकारी सोसायटी दिनकर मुसळे, मदन वासेकर, सरपंच बुटले, घनश्याम नांदेकर, दिनकर पा. मालेकर, चुनाळा सरपंचा कविता उपरे, माजी सरपंच तुकाराम माणुसमारे, सदस्य दीपक वांढरे, हनमंतराव नडपल्ली, कुंभेझरीचे सरपंचा कमलबाई जाधव, उपसरपंच दत्ता कांबळे, सदस्य अनिता गोतावळे, अंकिता कांबळे तसेच या भागातील नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे. (तालुका प्रतिनिधी)