पोंभुर्णा येथील एम.आय.डी.सी.ला मंजुरी

By Admin | Updated: August 8, 2015 01:04 IST2015-08-08T01:04:54+5:302015-08-08T01:04:54+5:30

जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Approval of MIDC in Pomburna | पोंभुर्णा येथील एम.आय.डी.सी.ला मंजुरी

पोंभुर्णा येथील एम.आय.डी.सी.ला मंजुरी

शासन अधिसूचना निर्गमित : सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला आले
चंद्रपूर : जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने प्रसिध्द केली आहे. वित्त आणि नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. यामुळे या भागातील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पोंभुर्णा या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त तालुक्यातील औद्योगिक विकासाच्यादृष्टीने या तालुक्यासाठी एम.आय.डी.सी. स्थापन करण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवर यांनी गेल्या पाच वषार्पासून सातत्याने पाठपुरावा केला आहे.
यासंदर्भात विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करुन त्यांनी ही मागणी शासन दरबारी रेटली. त्यांच्या सततच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले. पोंभुर्णा औद्योगिक क्षेत्रासाठी कोसंबी रिठ, चकहत्तीबोडी व देवाडा खुर्द येथील १८४.६७ हे.आर. खासगी क्षेत्र अधिसूचित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शासनाला सादर केला. शासनाने त्यास मंजुरी देवून अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विभाग अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्याच्या सूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक ६ आॅगस्टच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दिल्या आहेत. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एम.आय.डी.सी. स्थापन करण्याचे आश्वासन पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांना दिले होते. त्यांनी दिलेल्या या आश्वासनाची पुर्तता झाली असून या माध्यमातून पोंभुर्णा या आदिवासीबहुल नक्षलप्रभावीत तालुक्याचा औद्योगिक विकास साधला जाणार आहे.
त्याचबरोबर या तालुक्यातील तरुणांना रोजगारसुध्दा उपलब्ध होणार आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी ना. मुनगंटीवार यांनी निर्माण केलेल्या विकास कामांच्या दीर्घ मालिकेत पोंभुर्णा एम.आय.डी.सी. हा ठळक टप्पा ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Approval of MIDC in Pomburna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.