चार आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे भरण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST2021-06-10T04:20:08+5:302021-06-10T04:20:08+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोना बाधित झाले. यावर्षी परिस्थिती अधिक बिकट झाली. अनेकांना आपले जीव ...

Approval to fill 15 posts in each of the four health centers | चार आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे भरण्यास मंजुरी

चार आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे भरण्यास मंजुरी

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोना बाधित झाले. यावर्षी परिस्थिती अधिक बिकट झाली. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अनेकांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. क्षेत्रातील विरूर स्टेशन, शेणगाव, नांदाफाटा व भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधकाम पूर्ण झाले असतानासुद्धा ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा वेळीच उपचार मिळत नाही. ही विदारक आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडली. राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक प्रमाणात कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी केली. या मागणीला यश येऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन, जिवती तालुक्यातील शेणगाव, कोरपना तालुक्यातील नांदाफाटा आणि गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभरती मंजुरी संदर्भात नुकताच दि. ७ जून रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या क्षेत्रातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल, ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर व आपल्या नजिकच्या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाॅक्स

राजुरा क्षेत्रात अशी होणार पदभरती

वैद्यकीय अधिकारी - २, आरोग्य सहाय्यक स्त्री व पुरुष -२, सहाय्यक परिचारिका - १, औषध निर्माण अधिकारी - १, कनिष्ठ लिपिक - १, प्रयोगशाळा अधिकारी - १, आरोग्य सहाय्यक - १, स्त्री परिचर - १, पुरुष परिचर - ३, वाहनचालक - १,सफाईगार - १ अशी १५ पदे प्रत्येक आरोग्य केंद्रात मंजूर करण्यात आली आहेत.

Web Title: Approval to fill 15 posts in each of the four health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.