५ कोटी ६६ लाखांच्या विकास कामांना मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:34+5:302020-12-12T04:43:34+5:30
कोरोना संकटामूळे अनेक नविन विकास कामांवर अनिष्ट परिणाम झाला. परंतु, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकांसाठी ५ कोटी ६६ लाखांच्या खनिज ...

५ कोटी ६६ लाखांच्या विकास कामांना मंजूरी
कोरोना संकटामूळे अनेक नविन विकास कामांवर अनिष्ट परिणाम झाला. परंतु, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकांसाठी ५ कोटी ६६ लाखांच्या खनिज विकास निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या खनिज विकास निधीतून चंद्रपूर येथील दूध डेअरी ते चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन रोडच्या झरपट नाल्यावर बंधा-यासह पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. लालपेठ जूनी वस्ती येथील रस्त्याचे रुंदीकरण व कॉंंक्रीट रस्ता व नालीच्या बांधकामासह सिंमेट बेंचेस लावणे, घुग्घूस येथील तेलगू समाजभवनाचे बांधकाम, साखरवाही येथे सिमेंट कॉंक्रीट रोडचे बांधकाम, पठाणपूरा येथील बगिचाच्या खूल्या जागेवर रंगमंच व खोलीचे बांधकाम, चांदा क्लब ग्राउंड येथील सभामंचाला ग्रीन रुमचे बांधकाम व वेंढली येथे पांदन रस्त्यासह खडीकरण इत्यादी कामे प्रस्तावित आहे.