ब्रह्मपुरी क्षेत्रात तीन कोटींच्या विकास कामांना मंजुरी

By Admin | Updated: September 7, 2015 01:21 IST2015-09-07T01:21:50+5:302015-09-07T01:21:50+5:30

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती.

Approval of development work of Rs. 3 crores in Brahmapuri area | ब्रह्मपुरी क्षेत्रात तीन कोटींच्या विकास कामांना मंजुरी

ब्रह्मपुरी क्षेत्रात तीन कोटींच्या विकास कामांना मंजुरी

ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघाताला सुद्धा समोरे जावे लागत होते. याची दखल घेत आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता आणि कर्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांना लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून रस्ता दुरुस्तीसाठी निधी देऊन कामे मंजूर करावे, अशी मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रात २ कोटी ५७ लक्ष ७० हजार विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्याचा समावेश असून निवडणुकीपूर्वी या तीनही तालुक्यांमध्ये दौरे करीत असताना अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनात आले. त्यांनी नागरिकांना रस्ते बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.
वचनपूर्तीसाठी आमदार वडेट्टीवार यांनी रस्ते दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे सावली तालुक्यातील बोथली, सावली, सिर्सी, व्याहाड रस्ता बांधकामासाठी ४२ लाख ७८ हजार रुपयांचा निधी, व्याहाड, निफंद्रा, अंतरगाव, मुडझा रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ४२ लाख ७३ हजार रुपये, व्याहाड (बु.) ते गाव तलावपर्यंतच्या रस्त्यासाठी २८ लाख ४२ हजार रुपये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नेरी, बोथली, तळोधी, मेंडकी, गांगलवाडी रस्ता कामासाठी ३८ लाख ३७ हजार रुपये, सिंदेवाही तालुक्यातील मंगरमेंढा, पालेबारसा, जनकापूर, सामदा रस्त्याच्या कामासाठी २९ लाख ५९ हजार रुपये, वासेरा, गडबोरी, सिंदेवाही रस्ता कामासाठी ४१ लाख ६० हजार रुपये, असा एकूण २ कोटी ५७ लाख ७० हजार रुपयांच्या कामांना ५०५४ मार्ग व पूल त्यावरील भांडवली जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत १ सप्टेंबर रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. या कामांना लवकरच सुरूवात होणार असून अनेक रस्त्यांची दुरूस्ती होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आभार मानले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Approval of development work of Rs. 3 crores in Brahmapuri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.