निराधार योजना समितीच्या बैठकीत ८९ प्रकरणांना मंजुरी

By Admin | Updated: September 9, 2016 00:57 IST2016-09-09T00:57:16+5:302016-09-09T00:57:16+5:30

तालुका संजय गांधी निराधार योजना अशासकीय समितीची प्रथम सभा समितीचे अध्यक्ष सतीश धोटे यांच्या ...

Approval of 98 cases in the meeting of the unanimous plan committee | निराधार योजना समितीच्या बैठकीत ८९ प्रकरणांना मंजुरी

निराधार योजना समितीच्या बैठकीत ८९ प्रकरणांना मंजुरी

राजुरा तालुका : २६ प्रकरणे त्रुटीअभावी नामंजूर
राजुरा : तालुका संजय गांधी निराधार योजना अशासकीय समितीची प्रथम सभा समितीचे अध्यक्ष सतीश धोटे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. बैठकीमध्ये १०४ प्रकरण मंजुरीसाठी सादर करण्यात आले. त्यातील ८२ प्रकरणे मंजूर करण्यात आले. उर्वरीत लाभार्थ्यांची प्रकरण योग्य कागदपत्राच्या अभावी नामंजूर करण्यात आले.
बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष सतीश धोटे यांनी, संजय गांधी निराधार योजना ही समाजातील गरीब व वृद्ध नागरिकांसाठी आधार देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांंनी या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गरजूंना या योजनेचा लाभ देता यावा, यासाठी प्रयत्न करावे. तसेच या योजनेचे लाभार्थी ज्येष्ठ नागरिक व वृद्ध असल्यामुळे त्यांना या कामासाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना केल्या.
बैठकीला समितीचे सचिव तहसीलदार धर्मेश फुसाटे, निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार विणा बोरकर, समितीचे अशासकीय सदस्य माणिक उपलंचीवार, गिता पथाडे, मधूकर नरड, सतीश कोमडपल्लीवार, भाऊराव चंदनखेडे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाभार्थ्यांनी आम आदमी विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्याद्वारे करण्यात आले आणि या योजनेचे निकष व संपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. बैठकीचे संचालन तहसीलदार विना बोरकर यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Approval of 98 cases in the meeting of the unanimous plan committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.