घुग्घुस नगर परिषदेत सात अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:32+5:302021-02-05T07:33:32+5:30
नवीन वर्षात घुग्घुसला शासनाने नगर परिषद दिली. प्रशासक म्हणून तहसीलदार नीलेश गौड यांची नियुक्ती केली. ६ जानेवारीला त्यांनी ...

घुग्घुस नगर परिषदेत सात अधिकाऱ्यांची नियुक्ती
नवीन वर्षात घुग्घुसला शासनाने नगर परिषद दिली. प्रशासक म्हणून तहसीलदार नीलेश गौड यांची नियुक्ती केली. ६ जानेवारीला त्यांनी नगर परिषद प्रशासकाची सूत्रे घेतली तर आता जिल्हाधिकारी यांनी भद्रावती, बल्लारपूर, गडचांदूर नगर परिषदमध्ये कार्यरत सात विविध विभागाचे अधिकारी यांची घुग्घुस येथे तात्पुरती नियुक्ती केली असून दर मंगळवारी व गुरुवार दोन दिवस घुग्घुस नगर परिषदेमध्ये ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना कामकाजासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
आशिष धोंडे स्थापत्य, रवींद्र गड्डमवार कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, अभिषेक जांभुळे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, सचिन धकाते विद्युत अभियंता, विक्रम क्षीरसागर लेखापाल, नीलेश रासेकर पाणीपुरवठा, जल निस्सारण, स्वच्छता अभियंता, भूपेश कांबळे संगणक अभियंता अशी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.