विद्यापीठाकडून अखेर बाह्य परीक्षकाची नियुक्ती

By Admin | Updated: April 23, 2015 01:12 IST2015-04-23T01:12:03+5:302015-04-23T01:12:03+5:30

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू आहे.

Appointment of External Examiner finally from University | विद्यापीठाकडून अखेर बाह्य परीक्षकाची नियुक्ती

विद्यापीठाकडून अखेर बाह्य परीक्षकाची नियुक्ती

वरोरा : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाने बाह्य परीक्षकाची नियुक्ती करूनही ेबाह्य परीक्षक आलेच नाही. त्यामुळे चक्क सहा दिवस बाह्य परीक्षकाविना परीक्षा सुरू होती.
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. अखेर वृत्ताची दखल घेऊन बुधवारीच बाह्य परीक्षकांची तातडीने नियुक्ती करण्यात आली. या केंद्रावर आता बाह्य परीक्षा रुजू झाले आहेत.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयाच्या केंद्रावर १३ एप्रिलपासून परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाची नियुक्ती व त्यासोबत बाहेरील महाविद्यालयातील प्राध्यापकाची बाह्य परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येते.
गोंडवाना विद्यापीठाने बाह्य परीक्षक म्हणून नेमणूक केलेली व्यक्ती परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून गैरहज होती. ही बाब नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती व परीक्षा प्रमुखांनी विद्यापीठास तातडीने कळविली देखील. तरीही कसलीही दखल झाली नाही. अशा अवस्थत मागील सहा दिवसापासून लोकमान्य महाविद्यालयाच्या केंद्रावर बाह्य परीक्षकाविना परीक्षा सुरू होती.
सहा दिवस होवूनही लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बाह्य परिक्षक नाही, असे वृत्त १९ एप्रिल रोजीच्या अंकात प्रकाशित होताच विद्यापीठाने प्रशासनात खळबळ उडाली. अखेर २० एप्रिल रोजी सोमवारला बाह्य परीक्षकाची नियुक्ती करुन विद्यापीठाने अखेरीस उशिरा का होईना पण, झालेला गोंधळ सावरण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत यावर पडदा टाकला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Appointment of External Examiner finally from University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.