सफाई कामगारांना वारसा पद्धती लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:29+5:302021-03-22T04:25:29+5:30
चंद्रपूर : महानगरपालिकेत तसेच नगर परिषदेत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नोकरी दिल्या जाते. परंतु, कुली ...

सफाई कामगारांना वारसा पद्धती लागू करा
चंद्रपूर : महानगरपालिकेत तसेच नगर परिषदेत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नोकरी दिल्या जाते. परंतु, कुली कामगारांच्या वारसांना डावलण्यात येते. परंतु, समान काम, समान वेतन या कायद्यांतर्गत समान काम करणाऱ्या कामगारांना समान अधिकार लागू करावे, अशी मागणी कामगार संघटनेतर्फे कामगार मेळाव्यात करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. रमेशचंद्र दहीवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. यावेळी दहीवडे म्हणाले, महानगरपालिकेत तसेच नगर परिषदेत साफसफाईचे काम करणाऱ्या कामगारांना सफाई कामगार किंवा कुली म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सफाई कामगार जे काम करतात तेच काम कुली कामगारदेखील करतात. परंतु, सफाई कामगार सेवानिवृत्त झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्या त्यांच्या वारसांना लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नोकरी दिल्या जाते. परंतु, कुली, कामगारांच्या वारसांना हा नियम लागू नाही. परंतु, समान वेतन समान अधिकार या तत्त्वावर त्यांनासुद्धा वारसा पद्धतीनुसार कामावार घेण्याची मागणी केली. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. आभार आकाश भगत यांनी मानले. मेळाव्याला अनेक कामगारांची उपस्थिती होती.