कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: April 9, 2017 00:41 IST2017-04-09T00:41:38+5:302017-04-09T00:41:38+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे ....

Appeal to Chief Minister for questions of workers | कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे या प्रश्नांवर लक्ष वेधण्याकरिता चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या ठिकाणी कुठलाही सक्षम अधिकारी नसल्याने संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्याने असंघटीत कामगाराकरिता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सन २०११ ला सुरु केलेले आहे. परंतु या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या विभागात सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामगार या कार्यालयात दूरवरुन येऊन दिवसभर ताटकळत राहतात. सध्या शासनातर्फे असंघटीत क्षेत्रातील कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ, घरेलू कामगार मंडळ व बाल कामगार मंडळ, माथाडी कामगार मंडळ, यामध्ये येणाऱ्या नोंदीत लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील उद्योगामधील कामगाराच्या प्रश्नासंबंधी अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. अनेक दिवसापासून या विभागात सहायक कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे नियमित भरण्यात यावी, अनेक उद्योगामधील कामगारांना सुरक्षा सामुग्री पुरविण्यात येत नाही. तसेच या दृष्टीकोणातून कामगार विभागाच्या माध्यमातून नियमित निरीक्षण करणे गरजेचे असतानासुद्धा याकडे कामगार विभागात नियमित अधिकारी नसल्याने दुर्लक्ष होऊन अपघात घडण्याची शक्यात नाकारता येत नाही.

Web Title: Appeal to Chief Minister for questions of workers