आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या वतीने निवेदन
By Admin | Updated: March 14, 2016 00:59 IST2016-03-14T00:59:40+5:302016-03-14T00:59:40+5:30
आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी ...

आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या वतीने निवेदन
ब्रह्मपुरी : आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र भाऊड यांची बदली रद्द करण्याविषयीचे निवेदन उपविभागीय अधिकारीतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
नांदेडचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र भाऊड यांनी औरंगाबाद येथील जात पडताळणी समिती आयुक्ताच्या मदतीने ‘मन्नेरवारलू’ या बोगस गैरआदिवासी जातीच्या लोकांचे जातीचे प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा शोध लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. या प्रकाराला चिडून ‘मन्नेरवारलू’ या समुहाने शासन दरबारी संघटनेच्या आधारे आंदोलन करून डॉ. रवींद्र भाऊड यांची बदली करवून घेतली. त्यांची बदली एका कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय असल्याने बदली रद्द करण्यात यावी व त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा, यासाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय खंडाते, सचिव कपूर नाईक, गुरुदास कुमरे, प्रा. दिवाकर सिडाम, के.एस. पेंदाम, एम.एस. दलांजे, आर.जी. तुमराम, के.जी. घरत, ए.के.उईके, वाय.के.नहामूर्ते, एम.एस. महाल, प्रा.पी.टी. मडावी, जी.एस. कुमरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)